Pune Crime News | पुणे शहरातील येरवडा, रामटेकडी परिसरात घरफोडी, 52 लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात घरफोडी (House Burglary), जबरी चोरी (Robbery) आणि वाहनचोरीच्या (Vehicle Theft) गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात दररोज वाहन चोरीच्या घटना घडत असून, घरफोडी आणि जबरी चोरीच्या एक ते दोन घटना घडत आहेत. पुणे शहरातील येरवडा (Yerawada) आणि रामटेकडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी तब्बल 52 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे.

बांधकामासाठी आणलेल्या साहित्यापैकी 46 लाख 2 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रीकलचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. हा प्रकार 19 मार्च रोजी सकाळी दहा ते 26 मार्च रोजी सकाळी अकरा या कालावधीत वडगाव शेरी भागातील ब्रह्माकॉर्प बिझनेस पार्क व द कलेक्शनच्या साईटवर घडला आहे. याबाबत प्रदिप राजू पतंगे (वय-35 रा. शिवनेरी नगर, कोंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रदीप पतंगे यांच्या कंपनीने बांधकामाकरीता आणलेले साहित्य पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्याने पत्रे उचकटून त्यामध्ये ठेवलेले 46 लाख 2 हजार 520 रुपयांचे इलेक्ट्रीकल वायर व कॉपर वायरचे 97 बॉक्स व 34 बंडल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रदीप पतंगे यांनी शनिवारी (दि.30) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना वानवडी (Wanwadi) परिसरात घडली आहे.
चोरट्यांनी रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया (Ramtekdi Industrial Estate) येथील हारको ट्रान्सफॉर्मर्स लि. कंपनीतून 5 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
हा प्रकार 29 मार्च रोजी रात्री सात ते 30 मार्च रोजी सकळी साडेनऊ या दरम्यान घडला आहे.
याबाबत किरण दिपक जाधव (वय-38 रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी कंपनीच्या वायडिंग रुमच्या खिडकीचे गज तोडून कंपनीत प्रवेश करुन कंपनीतील सहा लाखांचा माल चोरुन नेला.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?