Pune Crime News : पुण्यात पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, पतीला अटक

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारिरिक छळ केला. सततच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात Pune घडली आहे. ही घटना 4 जून रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

पती दारु पिऊन पत्नीला मारहाण करत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता.

पतिकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पतिविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि स्वाती यांचे मागील वर्षी लग्न झाले होते.

लग्नानंतर रोहित स्वातीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता.

तसेच दारुसाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता.

तिचा छळ करत होता. शारिरीक व मानसिक छळाला वैतागून स्वातीने 4 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

याप्रकरणी पोलिसांनी पती रोहितला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.डी. सोनवणे करित आहेत.

Also Read This : 

 

Pune News : ‘…तर एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल’ – अजित पवार

 

Coronavirus : जाणून घ्या, घरात कोरोना रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी, लवकर कसे व्हाल रिकव्हर?

 

Instagram वर झाली त्यांची ‘फ्रेन्डशीप’, वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून 16 वर्षीय मुलीवर गँगरेप, मुंबईतील धक्कादायक घटना

 

लठ्ठपणा ‘या’ 5 पध्दतीनं नियंत्रित करा, असंख्य गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो कमी, जाणून घ्या

 

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

 

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या