Pune Crime News | पत्नी कायमची माहेरी गेल्यामुळे पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीसह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | इतरांबरोबर अनैतिक संबंधामुळे (Immoral Relationship) पत्नी घर सोडून जात असल्याच्या कारणावरुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) स्वप्निल गजरे (Swapnil Gajare) याला अटक केली असून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

कुणाल संभाजी शिंदे Kunal Sambhaji Shinde (वय ४३, रा. हौसिंग बोर्ड कॉलनी, येरवडा – Yerwada News) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांची आई पुष्पा शिंदे Pushpa Shinde (वय ७२, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station (गु. रजि. नं. २१७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याची पत्नी तसेच रितीक राज (Ritik Raj), स्वप्नील गजरे, सचिन चांदणे (Sachin Chandane) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल शिंदे (Kunal Shinde) याचा रिता हिच्याशी २००५ मध्ये विवाह झाला होता.
लग्नापासून कुणाल आणि रिता यांच्यात वाद होत. त्यांना दोन मुले आहेत.
सुमारे १० वर्षांपूर्वी तिने कुणाल याच्याकडे अट ठेवली की एक तर ती किंवा सासू आमचे घरामध्ये राहील.
त्यानंतर फिर्यादी या मुलीकडे रहाण्यास गेल्या. पुढे ७-८ वर्षापूर्वी तिचे सचिन चांदणे याच्याशी जवळीक वाढली.
त्यावरुन वाद झाल्यावर तिने परत संबंध ठेवणार नाही, असे सांगितले. त्यानंतरही कुणाल व तिच्यात वाद होत होते.
काही दिवसांपूर्वी कुणाल याने आपल्या आईशी रिता नीट वागत नाही.
तिला कायमचे माहेरी रहायला जायचे आहे, सतत ती कोणाशी तरी फोनवर बोलत असते.
तेव्हा फिर्यादी यांनी आता भांडु नका, मुलीची दहावीची परीक्षा होऊ द्या. त्यानंतर २८ मार्च रोजी त्याने फिर्यादी यांना सांगितले की,
उद्या दहावीचा शेवटचा पेपर आहे. रिताने माहेरी जायची सर्व तयारी केले असल्याचे सांगितले.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी २९ मार्च रोजी कुणाल याने आपल्या बहिणीला मेसेज केला.
त्यात तो आत्महत्या करत असून त्याचे आत्महत्येस रिता व तिचे तीन यार जबाबदार असल्याचे सांगितले.
कुणाल याच्या बहिणीने तातडीने हा प्रकार फिर्यादी यांना सांगितला.
त्यांनी घरी जाऊन पाहिले असता कुणाल याने बेडरुममध्ये फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गुरव (PSI Gurav) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Husband committed suicide by hanging himself as his wife left home forever; A case of abetment to suicide has been registered against the four including the wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज

 

Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)

 

LPG Cylinder Price | उद्यापासून स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो आणखी महाग, आज बुक केल्यास मिळेल थोडा दिलासा !