Pune Crime News | सोन्याचा नेकलेस बुक करण्यासाठी दिलेले पैसे पतीने केले खर्च, जाब विचारणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार; धायरी परिसरातील घटना

0
245
Pune Crime News | Husband spends money paid to book gold necklace, stabs wife for questioning; Incidents in Dhairi area
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोन्याचे नेकलेस (Gold Necklace) बुक करण्यासाठी दिलेल्या पैशांबाबत विचारणा केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार (Stabbing) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) पुण्यातील धायरी येथे रविवारी (दि.29) सकाळी अकरा वाजता घडली. याप्रकरणी पतीला सिंहगड पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

 

करुणा आनंद वाघमारे Karuna Anand Waghmare (वय-31 रा. धायरी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि.30) सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आनंद मसाजी वाघमारे Anand Masaji Waghmare (वय-37 रा. धायरी) याच्यावर आयपीसी 307, 325, 504, 506 सह आर्म अॅक्टनुसार (Arm Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती पत्नी आहेत. फिर्यादी करुणा यांनी चार महिन्यापूर्वी नेकलेसची बुकिंग करण्यासाठी 25 हजार रुपये पती आनंद वाघमारे यांच्याकडे दिले होते. मात्र, आरोपीने नेकलेसची बुकींग न करता पैसे खर्च केले. रविवारी फिर्यादी यांनी पैशांबाबत विचारणा केली असता आरोपीने रागाच्या भरात खर्च केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले.

आरोपी पतीने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादी या वडिलांकडे जाण्यासाठी निघाल्या.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या हाताचा चावा घेत बेडखाली ठेवलेला कोयता काढला.
आज तुला संपवतो असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने (Koyta) वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला.
याबाबत महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके (PSI Khadka) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Husband spends money paid to book gold necklace, stabs wife for questioning; Incidents in Dhairi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Annie Wersching | हॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रीचे कॅन्सरने निधन; वयाच्या 45 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक