पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध (Love Affair) असल्याची माहिती पतीला समजली. पतीने पत्नीच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याने युवकाने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) करुन जीवन संपवले. ही घटना (Pune Crime News) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंतरवाडी येथे गुरुवारी (दि.2) घडली.
मंगेश सुरेश जाधव Mangesh Suresh Jadhav (वय – 31 रा. मंतरवाडी मुळ रा. कल्याण जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मंगेश याचे वडील सुरेश मारुती जाधव (वय-53) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेसह तिच्या पतीविरोधात आयपीसी 306, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंगेश याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते.
या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला समजली.
यानंतर महिलेच्या पतीने मंगेश याला फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपींनी मंगेशला वारंवार मानसिक त्रास दिला.
आरोपींच्या त्रासाला वैतागून मंगेशने मंतरवाडी येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
आरोपींनी मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे (PSI More) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Husband’s threat to wife’s lover, extreme step taken by lover…; Incidents in Loni Kalbhor area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल