Pune Crime News | ICICI बँकेच्या मॅनेजरने घातला २७ लाखांचा गंडा; पोर्ट फोलिओमध्ये बनावट एन्ट्री करुन केली फसवणूक

पुणे : Pune Crime News | आय सी आय सी आय सिक्युरिटीचे शेअर्स (ICICI Securities Share) कमी किंमतीत खरेदी करुन देतो, असे सांगून बँकेच्या ब्रँच मॅनेजरने (ICICI Bank Branch Manager) पोर्ट फोलिओमध्ये बनावट एन्ट्री करुन ग्राहकांची २७ लाख ४६ हजार ५७४ रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी चेतन बळीराम इतापे (वय ३६, रा. वाघोली) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक सूर्यकांत कदम (Ashok Suryakant Kadam) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कदम हे आय सी आय सी आय बँकेचे मॅनेजर होते.
त्यांनी मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादी यांना आय सी आय सी आय सिक्युरिटीचे शेअर्स कमी
किंमतीत खरेदी करुन देतो, असे आश्वासन दिले. ते मॅनेजर असल्याने फिर्यादी यांचा विश्वास बसला.
कदम याने त्यांच्याकडून वेळोवेळी फोन पे, गुगल पे व एन ई एफ टीद्वारे २७ लाख ४६ हजार ५७४ रुपये स्वत:चे खात्यावर घेतले. फिर्यादी यांच्या आय सी आय सी आय सिक्युरिटीच्या पोर्ट फोलिओमध्ये बनावट एन्ट्री करुन त्यांच्यासाठी ते खरेदी केले असल्याचे दाखविले. आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक वराळ तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | ICICI Bank manager cheated 27 lakhs; Fraud by making fake entries in the portfolio

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar Resigns | शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनं फेटाळला, पुढं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष (Video)

Pune Cyber Crime News | अमेरिकेतील बहिण अडचणीत असल्याचे समजून त्याने पाठविले पैसे; सायबर चोरट्यांनी घातला दीड लाखांना गंडा