Pune Crime News | अराजपत्रित सेवांसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये एकाने स्पाय कॅमेर्‍याद्वारे फोडली प्रश्नपत्रिका; तब्बल 5 महिन्यांनी झाला प्रकार उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | अराजपत्रित सेवांसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये एका उमेदवाराने स्पाय कॅमेर्‍याचा (Spy Camera) वापर करुन संपूर्ण प्रश्न पत्रिका (Paper Leak Case) बाहेर पाठविली. त्यानंतर अन्य दोघांनी मोबाईलचा वापर करुन ती प्रश्न पत्रिका सोडविण्यास मदत केल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार तब्बल ५ महिन्यांनी उघडकीस आला असून लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission (MPSC) तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत लोकसेवा आयोगाच्या नोकरी कक्षा अधिकारी सुप्रिया मच्छिंद्र लाकडे (वय ३८, रा. नवी मुंबई) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश भाऊ सिंग घुनावत Akash Bhau Singh Ghunawat (वय २७, रा. राजेवाडी, पो. केळी धावण, ता. बदनापूर, जि. जालना), जीवन नायमाने आणि शंकर जारवाल अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील जे एस पी एम जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (JSPM Jayavantrao Sawant College of Engineering Hadapsar) येथे ३० एप्रिल रोजी सकाळी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब
(Maharashtra Non-Gazetted Group B), गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षे करीता जीएसपीएम जयवंतराव सावंत कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र होते. परीक्षाच्यावेळी आकाश सिंग याने स्पाय कॅमेरा बाळगून व त्या कॅमेराचा वापर करुन इतर व्यक्तींशी संपर्क केला. परीक्षेची सेट बी प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका जीवन नाय माने याने ही प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका शांकर जारवाल याचे मोबाईलवर पाठवले. स्वत:चा फायदा करता ही प्रश्न पत्रिका फोडली आहे. त्यातून त्यांनी शासनाची फसवणूक (Cheating Case) केल्याचे उघड झाले आहे. (Pune Crime News)

प्रश्नपत्रिका फुटल्याचे समजल्यानंतर लोकसेवा आयोगाने चौकशी केली.
परीक्षेच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला.
त्यानंतर आयोगाच्या वतीने नवी मुंबई पोलिसांकडे (Navi Mumbai Police) तक्रार देण्यात आली होती.
हा प्रकार वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने नवी मुंबई पोलिसांनी तो वानवडी पोलिसांकडे वर्ग केला
असून पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (PI Vinay Patankar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Traffic Changes | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे पवार-ठाकरेंना आव्हान, ‘उदयनिधींच्या विधानाला समर्थन असावे, मान्य असेल तर…’