Pune Crime News | पुण्यात तलवारीच्या धाकाने भाजी विक्रेत्याला लुटले, कोंढव्यातील घटना

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजी विक्रीतून दिवसभरात जमा झालेले पैसे मोजत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी विक्रेत्याला तलवारीचा धाक दाखवून (Pune Crime News) रोकड पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढव्यातील (Kondhwa) गोकुळनगर (Gokulnagar) गल्ली क्रमांक 4 जवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भिवाजी एकनाथ डोंबाळे (वय 37) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. In Pune, a vegetable seller was robbed with a sword, incident in Kondhwa

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे.
मार्केटयार्ड मधून भाजी खरेदी केल्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाजी विकत असतात.
रविवारी ते बटाटे विक्री करण्यासाठी खोपोली येथे गेले होते.
बटाटे देऊन रात्री उशिरा ते पुण्यात परत आले.
त्यावेळी कात्रज कोंढवा रस्त्यावरील (Katraj-Kondhwa Road) गोकुळनगर (Gokulnagar) गल्ली समोर त्यांचा टेम्पो पंचर झाला होता.
त्यामुळे ते येथे थांबले होते. त्यांनी एका नातेवाईकाला बोलावून घेतले होते.
त्याची वाट पाहत थांबल्यानंतर नातेवाईक आले.
ते आल्यानंतर दोघे टेम्पोत बसून दिवसभरात जमलेले पैसे मोजत होते.
त्याचवेळी पल्सर दुचाकीवरून तिघेजण त्यांच्याजवळ आले.
एकाने फिर्यादी यांच्या मानेल कोयता लावला तर दुसऱ्याने नातेवाईकाला पकडून ठेवले. तर एकाने फिर्यादी यांच्याकडे असलेली 28 हजार रुपये रोख आणि त्यांचा मोबाईल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेत पळ काढला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. अधिक तपास कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune Crime News In Pune a vegetable seller was robbed with a sword incident in Kondhwa

हे देखील वाचा

CBI in Mumbai High Court । तपास फक्त अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही; सीबीआयने दिली हायकोर्टाला माहिती

वयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या