Pune Crime News | पुण्यात तरूणीनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरूणाचा रेकॉर्ड केला नग्नावस्थेतील व्हिडीओ, उकळले पैसे

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  एका तरुणाला ऑनलाईन सेक्सचा मोह त्रासदायक ठरला असून, तरुणीने व्हाट्सअ‍ॅपपवरून व्हिडिओ कॉल (WhatsApp video call) केल्यानंतर नग्नावस्थेतील व्हिडिओ रेकॉर्डकरून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime News) आहे. सतत पैश्यांची मागणी होऊ लागल्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. Pune Crime News | In Pune, a young woman recorded a nude video of a young man via calling WhatsApp, demand of money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी अनोळखी तरुणीवर सायबर पोलीस (Cyber police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 29 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खासगी कंपनीत नोकरी करतात.
मुंढवा परिसरात राहतात. जानेवारी 2021 मध्ये त्यांची फेसबुकवर संबंधित तरुणीची ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली.
तर या तरुणीने चाट करण्यास देखील सुरुवात केली.
तसेच या तरुणाला मोबाईल क्रमांक दिला.
त्यानंतर तरुणाला ऑनलाईन सेक्स करण्याच्या बहाणा केला.
यानंतर दोघे व्हाट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करत नग्न अवस्थेत बोलत.
त्याचदरम्यान तरुणीने फिर्यादी यांचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ स्क्रीन रेकॉर्ड (Video screen record) केला. त्यानंतर या तरुणाला हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. भितीपोटी त्याने वेळोवेळी एकूण 18 हजार रुपये दिले.
पण, सतत पैश्यांची मागणी होत असल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत तरुणीचा शोध घेतला जात आहे.
अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

Web Title : Pune Crime News | In Pune, a young woman recorded a nude video of a young man via calling WhatsApp, demand of money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | पादचारी महिलांच्या हातातील मोबाईल हिसकाविणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक