Pune Crime News | अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला मारहाण, महिलेविरुद्ध FIR; हडपसरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अतिक्रमण विरोधी करावाई करणाऱ्या पथकातील (Anti-Encroachment Action Team) सहायक निरीक्षकाला (Assistant Inspector) व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेने सहायक निरीक्षकाला धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

स्नेहल विकी हुबळेकर (वय-30 रा. बंटर शाळेजवळ, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील (Hadapsar Regional Office) अतिक्रमण विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक पंकज पालाकुडतेवार Assistant Inspector Pankaj Palakudtewar (वय-30) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

गणेशोत्सवामध्ये गाडीतळ परिसरात बेकायदा पथारीवाल्यांविरोधात हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली.
फूल विक्री करणाऱ्या हुबळेकर हिला पथारी उचलण्यास सांगितले.
मात्र, तिने अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी राहुल चोर आणि सुभाष राखपसरे यांना शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी सहायक निरीक्षक पालाकुडतेवार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
महिलेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के (PSI Sontakke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar Group | आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू, सही कर नाहीतर…’