Pune Crime News | पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांनी गस्त वाढवूनही चोरीचे प्रकार सुरूच

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात घरफोडी (House Burglary), वाहनचोरी (Vehicle Theft), जबरी चोरीच्या (Robbery Case) घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मात्र, पोलिसांना न जूमानता चोरटे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लुटत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीस्वार चोरट्यांना पुणे शहरात धुमाकूळ घातला आहे. शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी नागरिकांकडून मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी गस्त वाढवण्याचे आदेश दिले असताना लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

कोंढवा येथील येवले वाडी भागात दूध वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाला अडवून चोरट्यांनी धारदार हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील 15 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि.22) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास के.जे. कॉलेज जवळ, येवलेवाडी येथे घडली. याबाबत सतीश महादेवराव पाटील (वय-30 रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी के.जे. कॉलेज जवळ सुरु असलेल्या एका बांधकाम साईटजवळ सतीश पाटील यांना अडवले. त्यांना धारदार हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील 15 हजार रुपयांची रोख रक्कम लुटून दुचाकीवरुन पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोंढवा परिसरात पादचारी महिलांकडील पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेली होती. एका तासात दोन महिलांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या.

तरुणाचा मोबाईल चोरून नेला

डेक्कन जिमखाना परिसरात आपटे रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा 30 हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. याबाबत गौरव विनयकुमार जयस्वाल (वय-34 रा. वेदांत सोसायटी, उंड्री, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. 21 जून रोजी जयस्वाल रात्री पावणे दहाच्या सुमारास आपटे रस्त्यावरील रामी ग्रँड हॉटेलसमोर मोबाईलवर ओला कार बुक करत होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी जयस्वाल यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार झाले. चोरट्यांच्या वाहनावर नंबर प्लेट नसल्याचे जयस्वाल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बेकरीत शिरून महिलेचे दागिने चोरले

दुकानात चॉकलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकानातील महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारुन चोरून नण्याचा प्रयत्न केला. महिलेने चोरट्याला प्रतिकार केला मात्र, चोरट्याने मंगळसुत्र घेऊन दुचाकीवरुन पसार झाला. ही घटना धायरीतील गारमाळ परिसरात घडली. याबाबत 40 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेचे धायरी भागात बेकरी आणि किरकोळ वस्तू विक्रीचे दुकान आहेत. रविवारी (दि.23) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिला व तिचा लहान मुलगा दुकानात होते. त्यावेळी चॉकलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरटा दुकानात शिरला. त्याने महिलेकडे चॉकलेटची मागणी केली. महिला चॉकलेट मोजून देत असताना त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून चोरट्याने मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चोरट्याना प्रतिकार केला. मात्र, त्याने गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारुन जबरदस्तीने ओढून चोरून नेले. महिलेने आरडा ओरडा केला असता चोरटा त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cashback On Gas Cylinder Booking | LPG सिलेंडरच्या बुकिंगवर मिळेल 10 टक्के कॅशबॅक, केवळ घ्यावे लागेल हे क्रेडिट कार्ड

Chandrakant Patil | ‘मी पालकमंत्री असताना अशाप्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत’, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा रोख कोणाकडे?

Jayant Patil On Pune Drug Case | पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’; सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची जयंत पाटलांची टीका

L3 – Liquid Leisure Lounge | फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात 7 जण अटकेत; पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन