Pune Crime News | ससुन हॉस्पिटलमध्ये शिकलकरी टोळ्यांमध्ये राडा, एक जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ससुन हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) आणण्यात आले असता दोन टोळ्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) शुक्रवारी (दि.24) घडली असून या प्रकरणी एकाला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे ससुन हॉस्पिटल मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

 

हडपसर येथील शिकलकरी यांच्या दोन गाटात हाणामारी झाली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीं आरोग्य तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी दुसऱ्या टोळीने समोरच्या टोळीवर हल्ला केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये काही महिला एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. तर काही तरुण हातात कोयता घेऊन एकावर वार करताना दिसत आहेत. (Pune Crime News)

 

 

या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत
आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा (Attempted Murder) गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime News | In Sassoon hospital, Shikalkari gangs fight, one person detained

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | बुधवारी डेक्कन, कोथरुड भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Kasba Peth Bypoll Election | पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात 1700 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Vh1 Supersonic | भारताचा स्वतःचा बहु-शैली संगीत आणि जीवनशैली महोत्सव, व्हीएच1सुपरसॉनिक, पुण्यात