Pune Crime News | सहजयोग ध्यान शिबीरात चोरट्याने नजर चुकवून गंठण नेले चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | आंबेगाव येथील सहज ध्यान शिबीरासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे गंठण मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून चोरुन नेले. (Pune Crime News)

याबाबत शेवाळवाडीतील एका ५८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३३/२४) दिली आहे. हा प्रकार आंबेगाव येथील मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधाकृष्ण गार्डन समोर रविवारी दुपारी एक वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या श्री माताजी निर्मला देवी यांचा सहजयोग ध्यान धारणेचा कार्यक्रम असल्याने त्या आल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे २५ ग्रॅम सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून