Pune Crime News | पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण, धायरी मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अपहरण (Kidnapping Case) करुन पळवून नेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरुन चार अनोळखी व्यक्तींनी एका 22 वर्षाच्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन बेदम मारहाण (Beating) करत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.11) सकाळी साडे अकराच्या सुमारास धायरी ब्रिजवर कचरा डेपो जवळ घडली. (Pune Crime News)

याबाबत अर्जुन रंगराव राठोड (वय-22 रा. रायकर मळा, पुणे) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीवरील अज्ञात चार आरोपींवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन राठोड याच्या मैत्रिणीला आज्ञात आरोपीने तिच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिचे अपहरण करुन पळवून नेले आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अर्जुन राठोड कॅनॉल रोडवरील कचरा डेपोजवळून पायी चालत जात होता. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चार अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आले.
त्यांनी पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरून अर्जुनला आडवले.
तसेच ‘मुलगी कोठे आहे सांग नाहितर मारुन टाकीन’ अशी धमकी देऊन लाकडी बांबूने बेदम मारहाण केली.
तसेच ‘दोन दिवसात मुलगी घरी आणून नाही दिली तर तुला मारुन टाकेन’ अशी धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीमुळे पुण्यात 27 ठिकाणी आगीच्या घटना

Maharashtra Crime News | पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ