Pune Crime News | मित्राच्या भांडणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : Pune Crime News | एक महिन्यांपूर्वी मित्रांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून एका १७ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिघांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी रोहीत कैलास आढाव (वय १७, रा. किरकटवाडी) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साजन शहा, मयुर पोळेकर, अक्षय वाल्हेकर यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना धायरीतील उंबर्‍या गणपती चौकाजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा केटरींगचे काम करतो.
तो, त्याचा भाऊ रोशन आढाव, मित्र विशाल जाधव व भिमा जाधव हे गप्पा मारत बसले होते.
फिर्यादीचा मित्र रोहीत राठोड व साजन शहा याचा मित्र प्रशांत कांबळे यांच्यात १ महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती.
या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
साजन शहा याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्याने तो हाताने अडविल्याने उजव्या हाताच्या बोटावर, मनगटाजवळ, पंज्यावर बसून गंभीर जखमा झाल्या.
रोहीत याच्यावर उपचार करण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Incident in Sinhagad Road area where a minor was stabbed with a knife due to a quarrel between friends

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा