Pune Crime News | दालचाचे पैसे मागितल्याने डोक्यात सळई घालून केले जखमी; गुंडाला पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलमध्ये येऊन दालचा (Dalcha Rice) खाल्यानंतर त्याचे पैसे मागितल्यावर चालकाच्या डोक्यात लोखंडी सळईने मारुन गंभीर जखमी करणार्‍या व परिसरात दहशत पसरविणार्‍या गुंडाला समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

रामा देवा चकाले Ram Deva Chakale (वय २२, रा. दारुवाला पुल, सोमवार पेठ -Daruwala Pul Somwar Peth) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

याबाबत सलमान नौशाद शेख (वय ३६, रा. कोंढवा – Kondhwa) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. १६९/२३) दिली आहे. हा प्रकार नाना पेठेतील चाँदतारा मस्जीदाजवळील अलहिंद कॅटरर्स येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान शेख यांच्या अलहिंद कॅटरर्स (Alhind Caterers)
येथे रामा चकाले हा आला. त्याने दालचाची ऑर्डर दिली. दालचा खाल्यानंतर त्याच्याकडे पैस मागितले.
तेव्हा त्याने फिर्यादीस शिवीगाळ केली. कॅटरर्सच्या बाहेर पडलेली लोखंडी सळई आणून
त्याने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर मारुन गंभीर जखमी केले.
जर पैसे मागितले तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिली.
त्यानंतर तो हातातील सळई कॅटरर्सच्या बाहेर रस्त्यावर जमलेल्या लोकांसमोर हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
हे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रामा चकाले याला पकडले.
पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर