Pune Crime News | पीएमपीएमएल बसमध्ये चोरी करणार्‍या सराईताला अटक, मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पीएमपीएमएल बसमध्ये चोरी करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट-2 ने अटक केली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

विक्रम बाबुराव गायकवाड (36, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 होंडा युनिकॉन मोटारसायकल व 1 वन प्लस मोबाईल असा एकुण 45 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मोटारसायकलबद्दल लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil), पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) आणि त्यांचे पथक युनिट-2 च्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार कादिर शेख आणि समीर पटेल यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून त्यांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली. आरोपी विक्रम गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

अति वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे,
राहुल राजपुरे, कादिर शेख, समीर पटेल, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, गजानन सोनुने आणि
नागनाथ राख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…