Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट (Vh1 SuperSonic) या कार्यक्रमात 24 ते 26 फेब्रुवारी दरम्याने महागडे मोबाईल चोरीला (Mobile stolen) गेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना विमानतळ पोलिसांनी (Pune Police) सहा जणांच्या टोळीला अटक करुन 30 लाख 27 हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल जप्त (Pune Crime News) केले आहेत. आरोपी मोबाईल चोरी करण्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात आले होते.

असद गुलजार महंमद (वय-32 रा. कलामहल उंचा छलान, दिल्ली), निजाम बाबु कुरेशी (वय-35 रा. गाझीयाबाद, उत्तर प्रदेश), शाहबाज भोले खान (वय-26 रा. कबीर नगर, दिल्ली), राहुल लीलीधर कंगाले (वय-30 रा. गाझीयाबाद उत्तर प्रदेश), नदीम इब्राहिम मलीक (वय-40 रा. यमुनानगर, दिल्ली), प्रशांत के कुमार (रा. भद्रावती शिमोगा, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या कार्यक्रमातून मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी विमातळ पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे यांना एक व्यक्ती संशयास्पद दिसला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन चौकशी केली. त्यावेळी त्याने व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमात मोबाईल चोरी करण्यासाठी दिल्ली येथून आल्याची माहिती दिली.

तसेच त्याचे इतर साथीदार पुणे स्टेशन (Pune Station) येथील मिलन हॉटेलमध्ये थांबले असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या पथकाने मिलन हॉटेलमध्ये छाप टाकून इतर आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून 28 लाख 40 हजार रुपयांचे मोबाइल जप्त केले. तर प्रशांत कुमार याला 24 फेब्रुवारी रोजी अटक करुन त्याच्याकडून 1 लाख 87 हजार रुपयांचे पाच फोन जप्त केले. पोलिसांनी एकूण 30 लाख 27 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate) सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी
(Police Inspector Sangita Mali), पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे,
समु चौधरी पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे,
नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Interstate gang who came to Pune by plane and stole expensive phones busted by airport police, mobile phones worth 30 lakhs seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही; नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले’ – अजित पवार

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढला, भाजपने अखेरच्या क्षणी सामना फिरवला?

Kolhapur Crime News | कोल्हापुरात काका-पुतण्यामध्ये जोरदार भांडण; एकमेकांवर धारदार शस्त्राने केले वार