Pune Crime News | कात्रज परिसरात लोखंडी प्लेटा चोरणार्‍यांचा पर्दाफाश; भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News| भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातील 1 लाख 10 हजार रूपये किंमतीच्या 150 लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Crime News)

 

दत्ता धनाजी पाटोळे (19, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) आणि साहिल दत्ता ढावरे (19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, परिसरातील बिल्डींगच्या बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरीस जात होत्या. त्यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास करताना पोलिस अंमलदार मितेश चोरमोले आणि अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना परिसरात पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन मुले काही साथीदारांच्या मदतीने चोर्‍या करीत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीवरून पोलिसांनी प्रथम अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांना दत्ता पाटोळे आणि साहिल ढावरे यांची नावे समजली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक करून 1 लाख 10 हजार रूपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा जप्त केल्या. (Pune Crime News)

उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलिस अमंलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Iron plate thieves busted in Katraj area; Bharti University police arrested two

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप