Pune Crime News | सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एकाच सोसायटीत राहणारे दोन ज्येष्ठ नागरिक, एक चेअरमन तर दुसऱ्याला चेअरमन होण्याची इच्छा यातून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांना चप्पलने मारहाण करुन खुर्ची फेकून जखमी केले. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात (Pune Police) पोहचल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे (FIR) दाखल केले. हा प्रकार वडगाव येथील नवले पुलाजवळ (Navale Bridge Vadgaon) असलेल्या डी. व्हिस्टेरीया पार्क सोसायटीत (D. Wisteria Park Society) रविवारी (दि.3) रात्री सातच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी प्रताप आनंदराव पाटील (वय-67) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station)
दिलेल्या तक्रारीवरुन भालचंद्र निळकंठ देशपांडे (वय-60) यांच्यावर आयपीसी 324, 506, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सासायटीत राहतात. फिर्यादी हे सोसायटीचे चेअरमन (Society Chairman) आहेत. तर आरोपी यांना चेअरमन व्हायचे आहे. आरोपीने रागामध्ये तू चेअरमन पदाचा राजीनामा दे मला चेअरमन व्हायचे आहे. तू मला कोणतेही काम सांगायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन प्लास्टिकची खुर्ची फिर्यादी यांना फेकून मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. (Pune Crime News)

याविरोधात देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे चेअरमन यांना तुम्ही मला चेअरमन नको आहे, असे म्हणाले असता चेअरमन यांना त्याचा राग आल्याने
त्यांनी शिवीगाळ केली. तसेच पायातील चप्पल काढून फिर्यादी यांना मारली. तर शेजारील प्लास्टिक खुर्चीने मारहाण
करुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Crime News | ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक

Shivsena UBT | शिवसेनेचे मोदी सरकारला आव्हान, हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या