Pune Crime News | कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाहनात सापडली लाखोंची रक्कम, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार (Campaign) शिगेला पोहोचला आहे. पोटनिवडणुकीसाठी अधिकारी आणि पोलीस चेक पोस्टवर गाड्यांची तपासणी करत आहेत. गाड्यांची तपासणी करत असताना एका गाडीत पाच लाख रुपयांची रोकड (Seized Cash) सापडली आहे. यानंतर तातडीने स्वारगेट पोलीस (Swargate Police) आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी (Election Officers) ही रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी गाडी आणि वाहन चालक यांना ताब्यात घेतले आहे. हे पैसे कशासाठी (Pune Crime News) वापरले जाणार होते, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस (Pune Police) सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) येत्या 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात थेट लढत होत आहे. त्यातच बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सात तास बैठका घेतल्या. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप विजयासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यासर्व घडामोडीदरम्यान कसबा निवडणुकीच्या प्रचारात पोलिसांनी पाच लाखाची रोकड जप्त केली आहे. (Pune Crime News)

जप्त केलेल्या रकमेबाबत निवडणूक अधिकारी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) चौकशी करत आहेत.
ज्या गाडीमध्ये ही रक्कम आढळून आली त्या गाडी चालकाकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
परंतु चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने ही रक्कम निवडणुकीसाठीच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जर ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी आणली असेल, तर यातील किती रक्कम वाटण्यात आली,
याचा तपास पोलीस करीत आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 

Web Title : – Pune Crime News | kasba bypoll campaign swargate police seized cash of five lakhs from a suspicious vehicle pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)