Pune Crime News |  मैत्रीणीला भेटायला कात्रज तलावाजवळ आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या तिघांकडून 15 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News |  घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या तीघांना अटक करुन भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Crime News) पोलिसांनी दोन गुन्ह्यामध्ये 24.1 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery), हिऱ्याचे दागिने (Diamond Jewellery), चांदी (Silver) असा एकूण 15 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station)  हद्दीतील गुजर निंबाळकरवाडी कात्रज येथील फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी फ्लॅटमधून 11 लाख 28 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत केदार बाळकृष्ण सावंत (Kedar Balkrishna Sawant) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार 23 जुलै रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळापासून 27 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ( Pune Crime News)

दरम्यान, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे व सचिन गाडे यांना माहिती मिळाली की घरफोडीच्या गुन्ह्यात (Burglary Crime) सराईत अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना 30 जुलै रोजी एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी कात्रज तलाव (Katraj Lake) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडुन गुन्ह्यातील 22 तोळे सोन्याचे दागिने, हिरे व चांदी असा एकूण 12 लाख 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

जबरी चोरी करणारे गजाआड

जे.एस.पी.एम समोरील बस स्टॉपवरुन रिक्षाने आंबेगाव बु. येथे घरी जात असताना रिक्षामधील दोघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम तसेच रिक्षा चालकाने फिर्यादी यांची लॅपटॉपची बॅग जबरदस्तीने चोरी करुन फिर्यादी यांना रोडवर ढकलून देऊन पळून गेले. हा प्रकार 20 जुलै रोजी रात्री सव्वा बारा ते साडे बारा दरम्यान महामार्गावरील राजवीर प्युवर व्हेज हॉटेल समोरील रोडवर घडला होता.

या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी करत असताना पोलीस अंमलदार अवधूत जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सुदर्शन शिवाजी कांबळे (वय-22 रा. वाजे म्हाडा कॉलनी, पुणे) ओम सुरेश ढेबे (वय-18 रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून 2.1 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, घड्याळ, लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 3 लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior PI Vijay Kumbhar),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (PI Vijay Puranik), गिरीशकुमार दिघावकर (PI Girish Kumar Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta)
पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे,
सचिन सरपाले, नरेंद्र महांगरे, आशिष गायकवाड, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी,
शैलेश साठे, अभिजीत जाधव, महेश बारावकर, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 50 हजाराच्या लाचप्रकरणी पुण्यातील पोलिस अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक