Pune Crime News | दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांच्या टोळीला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. एका व्यापाऱ्याला लुबाडण्याचा त्यांचा डाव होता. शिवमंदिर व अंबाबाई देवीच्या मंदिर भागातून त्यांना पकडले. निखिल विश्वास थोरात (वय 22), द्वारकाधीश बाबासाहेब पवार (वय 23), सुरेश रमेश भिसे (वय 20) आणि यश उर्फ आदित्य सुभाष लोंढे यांना पकडले आहे. दोन साथीदार पळून गेले आहेत. पोलीस शिपाई सुनील वालकोळी यांनी याप्रकरणी खडक पोलीस (Khadak Police) ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.
एक बांबूचे व्यापारी पहाटेच्या वेळी त्याच्या दुकानांमध्ये देवपूजा करण्यासाठी येत असतो व त्याच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश असते अशी माहिती या आरोपीना मिळाली होती.
त्यानंतर त्यांनी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमले होते.
मात्र त्यापूर्वीच खडक पोलिसांना Khadak Police हा प्रकार समजला.
त्यानंतर पोलिसांनी त्यांना सापळा लावून पकडले.
यावेळी त्यांच्याजवळ दोन कोयते, एक नायलॉनची दोरी.
मिरचीपूड इत्यादी दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य सापडले.
येथील शिवमंदिर व अंबाबाई देवीच्या मंदिराजवळ ते दबा धरून बसले होते.
पोलिसांनी यातील चौघांना अटक केली असून अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
अधिक तपास खडक पोलीस Khadak Police करत आहेत.

Also Read This : 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

अ‍ॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

Pune Crime News : कोंढव्यात गुन्हेगारांचा तलवारीसह धुडगुस !जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून हॉस्पिटलची फोडली काच , बाहुबली तलवारीने हफ्ता वसुलीसाठी ‘दहशत’

Wab Title : Pune Crime News | Khadak police arrested a gang of 4 people who were preparing to commit a robbery