पुणे : Pune Crime News | मित्रांवर रुबाब दाखविण्यासाठी आपला शौक म्हणून जवळ पिस्तुल बाळगणे एका सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Record) चांगलेच अंगाशी आले (Pune Crime News). पोलिसांनी सेव्हन लव्हज चौकातील (Seven Loves Chowk) पुलाखाली थांबलेल्या सराईत गुंडासह दोघांकडून पोलिसांनी २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली. (Pistol Seized)
शुभम अनिल शिंदे Anil Subham Shinde (वय २४, रा. महर्षीनगर) आणि सिद्धेश अशोक शिगवन Siddhesh Ashok Shigwan (वय १९, रा. गुलटेकडी) अशी त्यांची नावे आहेत. शिंदे याने सिद्धेश शिगवन याच्याकडे दुसरे पिस्तुल ठेवण्यास दिले होते. त्यामुळे शिंदे बरोबरच शिगवनलाही पोलिसांनी (Khadak Police) अटक केली आहे.
शुभम शिंदे याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाणे (Swargate Police Station) व विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) मारामारी, बेकायदा जमाव जमविण्यासह दोन गुन्हे दाखल आहेत.
याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम शिंदे याला मित्रांवर इम्प्रेशन मारण्याचा शौक होता. त्यासाठी त्याने तीन ते चार महिन्यांपूर्वी दोन गावठी पिस्तुले आणली होती. त्यातील एक पिस्तुल त्याने शिगवन याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. शिंदे व शिगवन ही पिस्तुले कमरेला लावून सेव्हन लव्हज चौकात थांबले होते. खडक पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase), पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे (PSI Prahlad Dongle) , हवालदार ठवरे, जाधव, ढावरे, चव्हाण हे गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शुभम शिंदे व सिद्धेश शिगवन हे सेव्हज लव्हज चौकात थांबले असून त्यांच्याकडे पिस्तुल आहे. या माहितीनुसार पोलीस सेव्हन लव्हज चौकात गेले. तेथे थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. शुभम शिंदे याच्या झडती पिस्तुल व २ काडतुसे आणि सिद्धेश शिगवन यांच्याकडे एक पिस्तुल व एक काडतुस मिळून आले.
दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करीत आहेत.
ही कामगिरी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan),
पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार (PI Sharmila Sutar) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, किरण ठवरे, नितीन जाधव, लखन ढावरे,
आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, समीर भोरडे, भालचंद्र दिवटे,
कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगज, उमेश मठपती, शेखर खराडे यांनी केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा
DCP Vivek Masal | विवेक मासाळ सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी