Pune Crime News | खडकी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा 12 तासाच्या आत उघड, मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खडकी पोलिसांनी (Khadki Police) घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासाच्या आत उघड केला असून 88 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घरफोडीचा गुन्हा करणार्‍या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रेंजहिल्स खडकी येथील राहुल के (34) यांचे मित्र जे भगतसिंग यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यादरम्यान अल्पवयीन मुलाने घरफोडी करून घरातील 88 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याबाबत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास करून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने चोरलेला 88 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे
(ACP Arti Bansode), वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magadum), उपनिरीक्षक संतोष भांडवलकर (PSI Santosh Bhandwalkar), सहाय्यक उपनिरीक्षक कांबळे, पोलिस नाईक कलंदर, निकाळजे, पोलिस अंमलदार दिघे, पठाण यांच्या पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणुन मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title :- Pune Crime News | Khadki police revealed the crime of burglary within 12 hours, seized the items

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळेलही, पण त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले – छगन भुजबळ…

Bhaskar Jadhav | ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे; म्हणाले…