Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – तिप्पट पैसे परत केल्यानंतरही दिली जीवे मारण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍याला अटक

पुणे : Pune Crime News | मुलीला मेडिकलला (MBBS Admission )प्रवेश घेण्यासाठी ४ ते ५ टक्के व्याजाने पैसे घेतले. साडेसात लाखांवर २० लाख रुपये परत केल्यानंतरही अजून साडेआठ लाखांची मागणी करुन ते न दिल्यास जीव ठार मारण्याची धमकी (Threats to kill) देणार्‍याला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

निरजकुमार रामचंद्र मंडल Nirajkumar Ramchandra Mandal (वय ४५, रा. गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पिंपळे गुरव येथील एका ४८ वर्षाच्या नागरिकाने खडकी पोलीस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२९/२३) दिली आहे. हा प्रकार मे २०१७ ते ७ एप्रिल २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी पैशांची गरज होती.
तेव्हा त्यांनी निरजकुमार मंडल (Money Lenders Pune) याच्याकडून ४ व ५ टक्के दराने ७ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्याच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी मे २०२२ पर्यंत एकूण २० लाख ७४ हजार रुपये परत दिले. असे असताना वारंवार फोन करुन फिर्यादीच्या घरी, कार्यालयात येऊन शिवीगाळ करत. आणखी ८ लाख ५० हजार रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवत होता. उचलून घेऊन जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी तो देत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Khadki Police Station – Threatened to kill even after returning triple money; Illegal moneylender arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला

Pune Pimpri Chinchwad Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप