Pune Crime News | अपहरण करुन कंपनी चालकाला लुटले, नंतर नवीन कंपनी सुरु करुन केली फसवणूक; पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंपनी मालकाचे अपहरण (Kidnapping) करुन पैसे लुटले. तसेच कंपनीचा डाटा व महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. त्यानंतर नवीन कंपनी सुरु करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर 2023 रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास खराडी-मांजरी रोडवरील जॅकवेल पुलावर घडला आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत संतोष शिवाजी पवार (वय-32 रा. सैनिक नगर, मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत विठ्ठल शिरसाट Hanumant Vitthal Shirsat (वय-29), श्रीकांत यशवंत पवार Shrikant Yashwant Pawar (वय-38) व त्यांचे दोन अनोळखी साथीदार, श्रीधर सयाजी साळुंखे Sridhar Sayaji Salunkhe (वय-28), जयश्री अजिंक्य कुरणे Jayashree Ajinkya Kurane (वय-39), वर्षा रमेश माने Varsha Ramesh Mane (वय-22) यांच्यावर आयपीसी 319, 321, 324, 339, 340, 347, 362, 364, 382, 392, 391, 415, 420, 425, 441, 442 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत सिरसाट हा फिर्यादी संतोष पोवार यांच्या कंपनीमध्ये कंन्सलटंट म्हणून काम करत होता. मात्र त्यांच्यामध्ये आर्थिक मतभेद झाल्याने सिरसाट कंपनीतून बाहेर पडला. 4 सप्टेंबर रोजी सिरसाट याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने संतोष पोवार यांच्या चारचाकी गाडीचा पाठलाग केला. खराडी-मांजरी रोडवर पवार यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करुन जबरदस्तीने खाली उतरवले. आरोपीने पोवार यांना स्वत:च्या गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.

आरोपींनी पोवार यांना पुरंदर येथील निर्जन ठिकाणी असणाऱ्या टेकडीवर नेले. त्याठिकाणी आरोपींनी पवार यांना
जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल व लॅपटॉप घेतला. हनुमंत सिरसाट याने त्याच्या अकाउंटला फिर्यादी यांच्या
कंपनीचे अकाउंट अॅड करुन घेतले. त्यानंतर फिर्य़ादीच्या बँक खात्यातून जबरदस्तीने पाच लाख रुपये ट्रानस्फर
करुन घतले.
तसेच चेक द्वारे 24 लाख रुपये घेतले. (Pune Crime News)

आरोपी श्रीधर साळुंके, जयश्री कुरणे व वर्षा माने यांनी संतोष माने यांच्या कंपनीचा डाटा व अतिशय महत्त्वाची
कागदपत्रे चोरली. चोरलेल्या कागदपत्रांच्या आधारावर आरोपींनी नवीन कंपनी सुरु केली.
तसेच संतोष पवार यांच्या कंपनीच्या क्लाईंट सोबत काम सुरु करुन फसवणूक केली.
संतोष पोवार यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सीआरपीसी 153(3) नुसार गुन्हा
दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मनिषा पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगे संतापले, ”अजून किती वेळ द्यायचा, फडणवीसांनी चर्चेला यावे, मराठे संरक्षण देतील”

Maratha Reservation | पुण्यात अजित पवार आणि उदय सामंतांचे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले