Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून वीटभट्टीवरील कामगाराचे अपहरण करुन केला प्राणघातक हल्ला

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) – पूर्ववैमनस्यातून वीटभट्टीवरील कामगाराचे अपहरण (Kidnapping) करुन त्याला काठी व दगडाने डोक्यात मारहाण (Pune Crime News) केल्याने तो बेशुद्ध झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गोविंद सुकलाल असे जखमी कामगाराचे नाव आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी सोमनाथ विक्रम शिंदे (वय २७, रा. केसरकरवस्ती, देऊळगावगाडा, ता. दौंड) यांनी यवत पोलिसांकडे (Yavat Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंकुश वसंत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

फिर्यादी हे केसरकरवस्ती येथील वीट भट्टीवर काम करतात.
ते २९ जून रोजी रात्री साडेसात वाजता घरी असताना त्यांचे चुलते आहेत.
त्यांनी अंकुश शिंदे याने तुमचा मजूर गोविंद सुकलाल याला अनुराग फॅब्रिकेशनजवळून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने पळवून सुपा बाजूकडे नेले असल्याचे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी हे दाजींना सोबत घेऊन शोध घेण्यास बाहेर पडले.
रात्री साडेआठ वाजता बेटपाटीचे जवळ मोकळ्या मैदानातील क्रिकेटच्या पीचजवळून ओरडल्याचा आवाज येत होता.
म्हणून ते तिकडे गेले तर मोटारसायकलच्या उजेडात गोविंद सुकलाल याला अंकुश काठीने व दगडाने मारहाण करीत होता. त्यांना पाहून तो पळून गेला.
त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेतून गोविंद याला वरवंडच्या रुग्णालयात नेले.
तेथे प्राथमिक उपचार करुन ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
गोविंद हा मारहाणीमुळे बेशुद्ध असून त्याची प्रकृती गंभीर आहे. यवत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Titel :- pune crime news | kidnapping and attempt to murder of brick kiln worker

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीसह राजकीय पक्षाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षाला अटक

IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ