Pune Crime News | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या 5 जणांवर FIR; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या तरुणाचे अपहरण केले (Kidnapping Case Pune). यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Marhan). ही घटना रविवारी (दि26) सायंकाळी चार ते सहा या दरम्यान शेती महामंडळ चौक व जनकवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

या घटनेत ओंकार उर्फ ओम राहुल धोत्रे (वय-18 रा. वडार हौसींग सोसायटी, वडारवाडी, पुणे) गंभीर जखमी झाला असून त्याने सोमवारी (दि.27) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निखील कुसाळकर (वय-24), अयान इनामदार, सुबोध सरोदे उर्फ चिवड्या (वय-24), ओंकार हिंगाडे (वय-23), अभिजीत चव्हाण (वय-21 रा. गोखले नगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 364अ, 324, 323, 504, 506/2, 141, 143, 145, 147, 148, सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 37/1 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपींनी फिर्यादी ओंकार याला यश बोरकर याच्यामार्फत शेती महामंडळ चौकात बोलावून घेतले.
ओंकार त्याठिकाणी आला असता आरोपींनी तु निशांत डोंगरे सोबत का राहतो, त्याने मला शिवीगाळ केली आहे, असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने अपहरण केले. त्याला कॅनॉलच्या बाजुला नेऊन एक तास हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच कोयता दाखवून तक्रार केले तर घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी ओंकार याला जनकवाडी येथील आयान इनामदार याच्या घरी नेले. त्याठिकाणी त्याला पुन्हा
बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केला. तसेच दोन्ही डोळ्यांवर मारहाण केली.
यामध्ये ओंकार याचे दोन्ही डोळे सुजले आहेत. यानंतर आरोपींनी ओंकार याला होमी भाभा चौकात आणून सोडले.
ओंकार याने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केकान करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?