Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना, तीन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खून (Murder Case) करण्यात आला. (Pune Crime News)

स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे Swapnil Vitthal Zomberde (वय १७, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर) असे खून (Murder In Pune) झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) तिघांना अटक केली आहे.

सनी रावसाहेब कांबळे (वय २५), अमन साजिद शेख (वय २२) आकाश हनुमंत कांबळे (वय २३, सर्व रा. मिरेकर वस्ती, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना हडपसरमधील मिरेकर वस्तीत रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६, रा. मिरेकर वस्ती, हडपसर) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. १४०६/२३) दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे याचे आरोपीबरोबर पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी स्वप्नील याच्या डोक्यावर लोखंडी हत्यारांनी वार करुन त्याला जीवे ठार मारले. सनी कांबळे व अमन शेख यांनी हातातील शस्त्रे हवेत फिरवून आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर त्याचा असाच मुडदा पाडू, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे (PSI Mahesh Kavale) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava | गणेशोत्सव काळात पुण्यातील ‘या’ 10 रस्त्यांवर जड वाहतूकीला बंदी

Pune Pimpri Chinchwad Crime News | इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षक पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

Pune Police Combing Operation | गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;
2 हजार 544 गुन्हेगारांची झाडाझडती, 757 जणांना अटक

Sharad Pawar-Ajit Pawar | पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार

Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना

Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत