Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे (pune crime news) : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सुरीने वार केल्याची घटना पुणे (pune crime news) शहरातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लग्नाची वरात पहात असताना आरोपीने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील सांगरुन गावात शनिवारी (दि.12) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली

रफिक इब्राहिम पानसरे (वय-50 रा. सांगरुन, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साहिल पानसरे (वय-21 रा. सांगरुन, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात रफिक पानसरे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याचे वडिल सादिक पानसरे आणि रफिक पानसरे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सादिक आणि रफिक यांच्यामध्ये जुन्या दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद आहेत. तसेच साहिल यांच्या बहणिला दोन वर्षापूर्वी रफिक याने शिवीगाळ केली होती. यावरून त्यांच्यातील वाद अधीकच वाढले होते.

लग्नाची वरात पहाताना हल्ला

शनिवारी रात्री गावात लग्नाची वरात सुरु होती. सर्वजण तिथे थांबून वरात बघत उभे होते. त्याचवेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर आणि पाठीत भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सादिक यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करित आहेत.

हे देखील वाचा :

मलेरिया तापामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते

Latur News Today | खळबळजनक ! भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

Relationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी ‘या’ 7 गोष्टींचा नक्की विचार करा, जाणून घ्या

 

केसांसाठी सर्वोत्कृष्ट कीवी हेअर मास्क, प्रत्येक समस्येपासून मुक्तता होईल; जाणून घ्या


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune crime news | knife attack young man watching wedding party attempt murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update