Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न करणार्‍याला 4 तासात अटक

Pune Crime News | Kondhwa Police Arrest Criminal Who Abscond In Attempt To Murder Case
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादातून धारदार हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न करणार्‍याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) केवळ 4 तासात अटक केली आहे. (Pune Crime News)

पवन रविंद्र राठोड (26, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 27) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रोहित अशोक खंडाळे (24, रा. सर्व्हे नं. 59, गल्ली नं. 04, शिवछत्रपती शाळेजवळ, कोंढवा बु.) हे त्यांचा मित्र वैभव साळवे यांच्यासह दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्या शेजारील परिसरात राहणारे मंगेश माने, सागर जाधव, पवन राठोड, सुरज पाटील आणि अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर हे देखील तेथे दारू पिण्यास बसले. दारू पित असताना झालेल्या वादातून आरोपींनी त्यांच्याकडे धारदार हत्याराने फिर्यादीवर सपासप वार केले आणि त्यांना गंभीररित्या जखमी केले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलिस आरोपींचा शोध घेत होते. आरोपी पवन राठोडबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यास केवळ 4 तासाच्या आत अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogle) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase), तपास पथकातील पोलिस हवालदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, अंमलदार गणेश चिंचकर, विकास मरगळे आणि राहुल थोरात यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. कोंढवा पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title :- Pune Crime News | Kondhwa Police Arrest Criminal Who Abscond In Attempt To Murder Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushama Andhare | संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवणार?, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार

Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील

Total
0
Shares
Related Posts