Kondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2 ठिकाणी हात ‘साफ’ करून 1,34,95,641रुपयाची चोरी करणाऱ्यांना हरियानातून अटक

पुणे (pune crime news) : पोलीसनामा ऑनलाइन –  उंड्री येथील न्याती विंड चेंइम्स सोसायटीतील (Nyati Wind Chimes Society of Undri)  माजी पोलीस महासंचालक राज खिलनानी (Former Director General of Police Raj Khilnani) यांच्यासह दोन घरात घरफोडी (Burglary) करुन तब्बल 1 कोटी 34 लाखांचा ऐवज लंपास करणार्‍या चोरट्यांना पुणे शहरातील (Pune City) कोंढवा पोलिस ठाण्यातील (Kondhwa Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हरियानाहून (Haryana) अटक (Arrest) केली आहे.
त्यांच्याबरोबरच चोरीचे दागिने (Jewelry) विकत घेणार्‍या सराफालाही अटक करण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

राजेशकुमार मोहनलाल सरोज (Rajeshkumar Mohanlal Saroj) (वय- 33), राकेशकुमार मोहनलाल सरोज (Rakesh Kumar Mohanlal Saroj) (वय 30, दोघे रा. नवी दिल्ली) आणि सराफ मदनलाल मोहनलाल कुम्हार (Madanlal Mohanlal Kumhar) (वय 30, रा. राजसंमद, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्याचे तपास पथकातील (Investigation team) सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे (Assistant Inspector of Police Chetan More) यांनी या अगोदर मनिषकुमार ऊर्फ सौरभ मदनलाल सरोज (Manish Kumar alias Saurabh Madanlal Saroj) (वय 19, रा. वसई, ठाणे) याला अटक केली होती.
राजेशकुमार, राकेशकुमार आणि मनिषकुमार हे मुळचे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतापगड जिल्ह्यातील (Pratapgad district) राहणारे आहेत.

पोलिस महासंचालकांच्याच घरात चोरीमुळे पुण्यात खळबळ

या तिघांनी मिळून 23 व 24 ऑगस्ट 2020 च्या दरम्यानच्या रात्री न्याती विंडचेंइम्स सोसायटीत शिरुन राज खिलनानी व नैला रिझवी (Raj Khilnani and Naila Rizvi) यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला व दोन्ही घरातील मिळून 1 कोटी 34 लाख 95 हजार 641 रुपयांचे डायमंड व सोन्याचे दागिने (Diamond and gold jewelry) आणि रोकड (Cash) चोरुन नेली होती.
निवृत्त पोलीस महासंचालकांच्याच (Retired Director General of Police) घरात चोरी झाल्याने पुण्यात (Pune) एकच खळबळ उडाली होती.

Bribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना पोलीस कोठडी

सीसीटीव्हीवरुन चोरट्यांचा माग

यादरम्यान सीसीटीव्हीवरुन CCTV कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) मनिषकुमार याला अटक केली होती.
मात्र, त्याच्याकडून पोलिसांना चोरीचा माल मिळाला नाही.
परंतु त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली होती.
त्यानुसार कोंढवा पोलिसांनी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना (New Delhi, Uttar Pradesh, Haryana) पोलिसांना या चोरट्यांविषयी माहिती कळविली होती.
दरम्यान, हरियाना पोलिसांनी राजेशकुमार आणि राकेशकुमार यांना पकडल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली.

दागिने सराफाला विकल्याची कबुली

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे (Assistant Inspector of Police Chetan More), संदीप मधाले व पोलीस पथक तातडीने हरियानाला रवाना केले त्यांनी दोघांना हरियाना पोलिसांकडून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दागिने मदनलाल कुम्हार या सराफाला विकल्याची माहिती दिली.

सराफाकडून मुद्देमाल जप्त

सराफाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून 8 लाख 10 हजार रुपयांची 180 ग्रॅमची सोन्याची लगड तसेच 90 हजार रुपयांची 21 ग्रॅमची लगड जप्त केली आहे.
मनिषकुमार याने चोरीच्या पैशांमधून खरेदी केलेला.
11 हजार रुपयांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यात वापरलेली कार व घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.

ही कामगिरी परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Deputy Commissioner of Police Namrata Patil), सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (Assistant Commissioner of Police Rajendra Galande), कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, संदीप मधाले, पोलीस पथक निलेश वणवे,ज्योतीबा पवार, लक्ष्मण होळकर, सुधाम वावरे, संजू कळंबे, सुशील धिवार, महेश राठोड, रमीझ मुल्ला यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | kondhwa police arrested burglars from Haryana

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक