Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून वाहन चोरी करणार्‍यास अटक, 5 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा परिसरात वाहन चोरीचे गुन्हे करणार्‍या आरोपीस पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी पाच लाख रूपये किंमतीची 5 वाहने जप्त केली आहेत. उघडकीस आलेले पाचही गुन्हे हे सन 2022 मधील आहेत. (Pune Crime News)

ईस्माईल शफी सय्यद Ismail Shafi Syed (44, रा. लक्ष्मीनगर, गल्ली नं. 4, कोंढवा बु.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये टाटा कंपनीचा टेम्पो चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. चोरी गेलेल्या वाहनाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे (Assistant Police Inspector (API) Anil Suravse) आणि त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार शोध घेत होते.पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage)तपासले. सन 2022 मध्ये आरोपीने वाहन चोरीचे गुन्हे केले होते. त्यामुळे पोलिसांचा ईस्माईल शफी सय्यद याच्यावर संशय निर्माण झाला. (Pune Crime News)

कोंढवा पोलिसांनी आरोपीबाबत सखोल माहिती घेतली असता तो वाहन विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे पोलिस अंमलदार सुहास मोरे आणि राहुल थोरात यांना समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेवुन त्याला दि. 8 मे 2023 रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वाहन चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5 लाख रूपये किंमतीची 6 वाहने जप्त करण्यात आली.

 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले
(PI Sanjay Mogale), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले (PI Sandeep Bhosale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस अंमलदार सुहास मोरे (Police Sushas More)
आणि राहुल थोरात (Police Rahul Thorat) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime News | Kondhwa Police arrested one in Vehicle theft case, 5 cases solved

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | भरत गोगावले पुन्हा प्रतोद होणार?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं;
म्हणाले-‘नियुक्ती बेकायदेशीर असली तरी ते…’

Pimpri Chinchwad Science Park | पिंपरी-चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा;
लायन्स् इलेव्हन, लिंक्स् इलेव्हन संघांची विजयी कामगिरी!

Rajnath Singh Pune Visit | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट;
बापट यांच्या स्मृतीचे केले स्मरण (VIDEO)