Pune Crime News | मोक्कातील आरोपी मित्राच्या जामिनाच्या पैशासाठी दान पेट्या फोडून चोरी करणार्‍यांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोक्कातील आरोपी मित्राच्या जामिनाच्या पैशासाठी कात्रज-कोंढवा रोडवरील (Katraj-Kondhwa Road) शत्रुंजय जैन मंदिरातील (Shatrunjay Jain Temple Pune) दानपेट्या फोडून त्यामधील रोख रक्कम चोरी करणार्‍या तिघांना कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे. त्यांच्या 4 अल्पवयीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

हसन मगदुम बादशाह ईटगी Hasan Magdum Badshah Itagi (18, रा. संतोष नगर चर्चा जवळ, कात्रज, पुणे), तेजस दिपक सणस उर्फ चिक्या Tejas Deepak Sanas Alias Chikya (19, रा. सुमती बाळवन शाळे शेजारी, सणस नगर, निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे) आणि आदित्य राजू गाडे Aditya Raju Gade (18, रा. खडकेश्वर महादेव मंदिर समोर, केळेवाडी, पौड फाटा, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 26 ते 27 एप्रिल दरम्यान कात्रज-कोंढवा रोडवरील शत्रुंजय जैन मंदिर बंद असताना चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यामधील रोख रक्कम चोरून नेली होती. त्याबाबत मंदिराचे व्यवस्थापक राजकुमार बन्सीलाल राजपुत यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. (Pune Crime News)

 

तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil) आणि पोलिस पथक आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिस पथकातील पोलिस अंमलदार सुरज शुक्ला व पोलिस अंमलदार अनिल बनकर यांना सदरील गुन्हा करणार्‍यांची नावे समजली. त्यापैकी एकजण इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ थांबलेला असल्याची माहिती कळाली. पोलिसांनी प्राप्त माहितीची खातरजमा केली.

पोलिस पथकाने सापळा रचुन एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला त्याने इतर आरोपींची नावे सांगितली.
त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली तर 4 अल्पवयीन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून 37 हजार 212 रूपये जप्त करण्यात आले.
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे (ACP Pornima Taware),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane), पोलिस निरीक्षक संजय मोगले (PI Sanjay Mogle),
पोलिस निरीक्षक संदीप भोसले (PI Sandeep Bhosale)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस हवालदार सतिश चव्हाण, पोलिस हवालदार निलेश देसाई,
पोलिस नाईक गोरखनाथ चिनके, पोलिस नाईक जोतिबा पवार,
पोलिस अंमलदार सुजित मदन, पोलिस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सागर भोसले,
सुरज शुक्ला आणि अनिल बनकर यांच्या पथकाने केली आहे.

 

Advt.

Web Title :- Pune Crime News | Kondhwa police arrested those who broke open donation boxes for the bail money of an accused friend in MCOCA Mokka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pranav Raorane | प्रणव रावराणे झळकणार ‘गुगल आई’ चित्रपटात ! दाक्षिणात्य निर्माता, दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकाविणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, अल्पवयीन ताब्यात

Sunny XI Karandak | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! आर्यन क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय !!