Pune Crime News | बोपदेव घाटात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बोपदेव घाटात (Bopdev Ghat Pune) गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्टल (Pistol) जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई (Pune Crime News) 10 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.

 

सोनुकुमार छोटेलाल सरोज (वय-23), मिथिलेश कुल्लन सरोज (वय-20 दोघे रा. पुणे रेल्वे स्टेशन जवळ, मुळ रा. बुढेपुर, ता. कुंडा, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश), राजा शिवपुजन सरोज (वय-20 रा. लोचनगढ, ता. कुंडा, जि. प्रतापगढ) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

 

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत करत होते. त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास बोपदेव घाटात तीनजण काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन (एमएच 03 ए.पी. 4880) तोंडाला रुमाल बांधून टेबल टॉप पॉईंटच्या (Table Top Point) दिशेने जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी दुचाकी वेगात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी टेबव टॉप पॉइंटच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आरोपींच्या गाडीचा पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्टल आढळून आले. पोलिसांनी 20 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त केले. तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil),
पोलीस अंमलदार निलेश देसाई, सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, बनसुडे,
ज्ञानेश्वर भोसले, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Kondhwa police arrested three people who were walking around with pistols in Bopadeo Ghat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा