Pune Crime News | बोपदेव घाटामध्ये हत्याराच्या धाकाने जबरी चोर्या करणार्या टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक, 8 गुन्हयांची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बोपदेव घाटामध्ये (Bopdev Ghat) हत्याराचा धाक दाखवुन जबरी चोर्या करणार्या टोळीतील 5 जणांना कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) ताब्यात घेतले असून त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे (Robbery In Pune). त्यांच्याकडून एकुण 8 गुन्हयांची उकल झाली असून पोलिसांनी एकुण 3 लाख 13 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये 5 दचाकी गाडया, एक धारदार सत्तुर, 7 मोबाईलचा समावेश आहे. (Pune Crime News)
यश रमेश ढेबे (19, रा. गल्ली नं. 16, नवीन वसाहत, भैरवनाथ मंदिर मागे, कात्रजगाव, कात्रज), विशाल रामनिवास गौतम (19, रा. फ्लॅट नं. 301, समर्थ हाईट्स, भाजी मंडईमागे, ओमसाई मंडळ जवळ, कात्रज), वसीम अब्दुल अजीज शाह (19, रा. आभास ईमारत, तिसरा मजला, साई स्नेहा हॉस्पीटल मागे, कात्रजगाव, कात्रज) आणि दिपक रमेश सुतार (25, रा. गल्ली नं. 1, दुगडचाळ, संतोषी माता मंदिर समोर, संतोष नगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे तर सोहेल कुरेशी (रा. साहिल आनंद सोसायटी जवळ, येवलेवाडी, कोंढवा बु.) हा अंधाराचा फायदा घेवुन फरार झाला आहे. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्तफा एहजेम खान (22) हा आणि त्याचा मित्र याहना खान हे दि. 16 जानेवारी 2022 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटातील टेबल टॉप पॉईंटवर (Table Top Point, Bopdev Ghat) गप्पा मारत असताना आरोपींनी त्यांना हत्याराचा धाक दाखवुन त्यांच्याकडील वन प्लस व रेड मी कंपनीचे 2 मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि रोख 10 हजार रूपये जबरस्तीने चोरून नेले होते. त्याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्हयाचा तपास कोंढवा पोलिस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील (PSI Swapnil Patil) आणि त्यांच्या पथकातील अंमलदार करीत होते. दि. 28 जानेवारी 2022 रोजी उपनिरीक्षक पाटील आणि त्यांच्या पथकांनी बोपदेव घाटातील टेबल टॉप पॉईंटवर सापळा रचला. तपास पथकातील पोलिस अंमलदार बनसुडे आणि मदन हे पब्लिक म्हणुन घटनास्थळी गप्पा मारत होते तर इतर पोलिस परिसरात सापळा रचुन बसले होते.
आरोपींनी दोन मोटारसायकलवरून येवुन पोलिस अंमलदार बनसुडे आणि मदन यांना हत्याराचा धाक दाखुवन मोबाईल फोनची मागणी केली.
तेवढयातच पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील आणि इतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळया.
आरोपींचा साथीदार सोहेल कुरेशी हा अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला.
पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस कोठडी असताना आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडून कोंढवा पोलिस ठाण्यातील
6 तर सासवड (Saswad Police Station) आणि राजगड पोलिस ठाण्यातील (Rajgad Police Station)
असे एकुण 8 गंभीर गुन्हे उघडकीस आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून एकुण 3 लाख 13 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक आयुक्त पौर्णिमा तावरे
(ACP Purnima Taware), कोंढव्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Saonwane),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogale) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलिस हवालदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, पोलिस नाईक रोखनाथ चिनके, जोतिबा पवार, पोलिस अंमलदार लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला आणि
ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने आरोपींना सापळा रचून अटक केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Kondhwa Police arrests a gang of armed robbers in Bopdev Ghat, solves 8 crimes
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…