Pune Crime News | स्वत:च्या घरात जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरात घुसून तोंडावर टॉवेल गुंडाळून हातातील सोन्याच्या बांगड्या (Gold Bangles) व सुनेच्या गळ्यातील गंठण जबरदस्तीने चोरून (Stolen) नेल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार (Pune Crime News) 2 फेब्रुवारी रोजी मिठानगर येथे घडला होता. या गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी यांची सुनच गुन्ह्याची मुख्य सुत्रधार निघाली. पोलिसांनी सुनेसह चौघांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

 

कासीम बुरानसाब नाईकवाडी (वय-21 रा. जेवरगी झोपडपट्टी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), मेहबुबसाब अब्दुलसाब बदरजे (वय-25 रा. निलकोड ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), अब्दूल दस्तगीर मुल्ला (वय-19 रा. गाव येड्रामी आंबेडकर चौक ता. येड्रामी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि 30 वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी सुनेच्या सासूने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

कोंढवा परिसरातील मिठानगर परिसरात चोरट्यांनी 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांच्या घरात शिरून तोंडावर टॉवल गुंडाळून सोन्याच्या बांगड्या आणि सुनेच्या गळ्यातील गंठण चोरुन नेले. पोलिसांनी सुनेकडे चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना सुनेवर संशय आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे कर्नाटकातील गुलबर्गामध्ये असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश वाघमारे यांना मिळाली.

 

पोलिसांच्या पथकाने गुलबर्गा येथून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता फिर्यादी या सुनेला कौटुंबिक कारणावरुन वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देत होत्या. तसेच तिचे सोन्याचे दागिने हे तिला देत नव्हते. त्यामुळे तिने आरोपी कासीम नाईकवडी याला तिच्या घरातून दागिने चोरुन नेण्यास सांगितल्याचे तपासात उघड झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे (Senior Police Inspector Santosh Sonawane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे,
पोलीस अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे,
अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Kondhwa Police handcuffed four persons
including daughter-in-law who faked forced theft in their own house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा