Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दीड वर्षापूर्वी कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील शेवाळे टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA) Mokka करण्यात आली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर टोळी प्रमुख वृषभ रामदास शेवाळे Taurus Ramdas Shewale (वय-24 रा. ऊरुळी देवाची, शेवाळवाडी) हा फरार झाला होता. अखेर कोंढवा पोलिसांनी आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातील चांदा गावातून बेड्या ठोकल्या (Pune Crime News) आहेत.

 

आरोपी वृषभ शेवाळे व त्याच्या साथीदारांवर 2021 मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात 302, 307, 326, 324, 323, 120(ब), 141, 143, 144, 147, 149, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act), मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. (Pune Crime News)

मोक्का गुन्ह्यात मागील दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी वृषभ शेवाळे हा अहमनदर जिल्ह्यातील चांदा गावात राहत असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस हवालदार निलेश देसाई व पोलीस नाईक जोतिबा पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने चांदा या गावात जाऊन आरोपी रात्री झोपेत असताना त्याला शिताफीने पकडले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (Pournima Taware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Crime Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil), पोलीस अंमलदार निलेश देसाई,
सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, बनसुडे, ज्ञानेश्वर भोसले, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Kondhwa Police handcuffed the head of Shewale tribe, who was absconding for one and a half years in Mokka crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचं टेन्शन वाढलं? ‘किंगमेकर’ ची प्रचारातून माघार

Pune Accident News | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, महिला डॉक्टरचा मृत्यू