Pune Crime News | पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारे कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 12 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हांडेवाडी भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावणाऱ्या (Mobile Thief) तिघांच्या कोंढवा पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई (Pune Crime News) दिल्ली पब्लिक स्कूल जवळ करण्यात आली.

उमर सलिम शेख (वय-19 रा. आदर्शनगर, तिरंगा चौक, उरुळी देवाची), कादिर ईक्बाल शेख (वय-19 रा. शिवाजी चौकाजवळ, उरुळी देवाची) यांना अटक (Arrest) केली आहे. तर त्यांच्या अल्पवयीन साथिदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपींचा शोध तपास पथकाकडून घेतला जात होता. त्यावेळी उंडी, मंहमदवाडी परिसरात पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे यांना माहिती मिळाली की, फेब्रुवारी महिन्यात हांडे लॉन्स येथे पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल करिझ्मा दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी चोरून नेला होता. ते तिघे दिल्ली पब्लिक स्कूलच्या (Delhi Public School) जवळ अंधारात थांबले असल्याची माहिती मिळाली.

पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास केला असता त्यांच्या घरातून चोरी केलेले 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
(Senior Police Inspector Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले
(Police Inspector Sanjay Mogle) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse) पोलीस अंमलदार महेश वाघमारे, गणेश चिंचकर,
राहुल रासगे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Kondhwa police seized 12 mobile phones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे