Pune Crime News | कोंढवा पोलिस स्टेशन – भावानेच भावावर वार करुन तोडली दोन बोटे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आई, पत्नीला शिवीगाळ का केली अशी विचारणा केल्याने आपल्याच भावाच्या हातावर वार करुन त्यांची दोन बोटे तोडण्याची घटना उंड्रीत समोर आली आहे. कोंढवा पोलिसांनी (Pune Police News) या भावाला अटक केली आहे. (Pune Crime News)

गणेश प्रकाश कड Ganesh Prakash Kad (रा. होले वस्ती, कडनगर, उंड्री) असे त्याचे नाव आहे. याबाबत मयुर प्रकाश कड (वय ३३, रा. कडनगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७९/२३) दिली आहे. ही घटना उंड्रीतील कडनगरमधील होले वस्तीत बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे भाऊ भाऊ आहेत. फिर्यादी मयुर कड हे पालखीला गेले होते. त्यावेळी गणेश याने त्यांची आई, पत्नी व मुले यांना शिवीगाळ केली होती. हे त्यांना घरी आल्यावर समजले. त्यामुळे त्यांनी गणेश याला जाब विचारला. त्याचा राग मनात धरुन गणेश याने धारदार हत्याराने मयुर यांच्यावर वार केला. त्यांनी हात आडवा घातल्याने तो वार हातावर बसून डाव्या हाताची दोन बोटे तुटली. त्यानंतर त्याने मयुर यांच्या मानेवर वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल करुन गणेश कड याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Kondhwa Police Station – Brother broke two fingers by stabbing brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही