Pune Crime News | कोंढवा : पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या पोटात खुपसला चाकू

पुणे : Pune Crime News | रमजान महिना सुरु झाल्याने त्याच्या खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागात पत्नीने पतीच्या पोटात, छातीवर वार करुन त्याला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत उस्मान अमीर खान Usman Amir Khan (वय ७१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा – Kondhwa News) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. न. ३३७/२३) दिली आहे. त्यानुसार त्यांची सून नाझमीन इम्रान खान Nazmeen Imran Khan (वय ४३) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या घटनेत इम्रान खान हा जखमी झाला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सून नाझमीन हिने तिचा पती इम्रान यास रमजान ईद सणानिमित्त खर्चाकरीता पैसे मागितले.
त्याने नकार दिल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली. त्या दरम्यान नाझमीन हिने रागाचे भरात तिच्या हातील चाकूने इम्रान याच्या छाती व पोटावर वार करुन गंभीर दुखापत केली. पोलीस उपनिरीखक वगरे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Kondhwa Wife stabs husband in stomach for non-payment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MS Dhoni | धोनीचा अजून एक विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला CSK चा पहिला फलंदाज
Maharashtra Govt News | सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद
Ratnagiri News | सभेवरून परतल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्येने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल