Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – वेगवेगळे बहाणे करून चारचाकींमधील बॅगा लंबाविणार्‍या परप्रांतीय टोळीला अटक, 8 गुन्हयांची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कारचा काचा फोडून, चाक पंक्चर झाल्याचा बहाणा करून आणि पैसे खाली पडल्याचे सांगुन चारचाकींमधील बॅगा चोरून (Bag Lifting Cases In Pune) नेणार्‍या परप्रांतीय टोळीला कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. (Pune Crime News)

राजशेखर धनशिलन (37, रा. मील कॉलनी, रामजीनगर, तिरूचिरापल्ली, पो.स्टे. इपुदूर, तमिळनाडू) आणि गिरीधरन उमानाथ (20, रा. गांधीनगर, पोस्ट – रामजीनगर, तिरूचिरापल्ली, तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 11 एप्रिल 2023 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढोले पाटील रस्त्यावर (Dhole Patil Road) उभ्या असलेल्या चारचाकीमधील पुढील सीटवरील काळया रंगाची लॅपटॉप बॅग आणि त्यामधील साहित्य असा एकुण 1 लाख 12 हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला होता. त्याबाबत कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

चोरीस गेलेल्या साहित्यापैकी एअर टॅगमध्ये (Air Tag Case) असलेल्या सॉफ्टवेअरच्या आधारे
सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे (API Dattatraya Ligade) आणि पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत
(PSI Shrikant Sawant) यांना आरोपींबाबत गोपीनय माहिती मिळाली.
एअर टॅगच्या जीपीएस लोकेशननुसार (GPS Location) दोघेजण संशयितरित्या शिवाजीनगर येथील
मॉर्डन कॅफे (Modern Cafe Shivaji Nagar Pune) परिसरात फिरत असल्याचे समजले.
कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने संशयितरित्या फिरणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पाहणी केली. त्यांच्याकडून दि. 11 एप्रिल 2023 रोजी ढोले पाटील रस्त्यावरील कारमधून चोरी झालेली बॅग जप्त करण्यात आली. आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडून कोरेगाव पार्क, अलंकार पोलिस स्टेशन (Alankar Police Station), शिवाजीनगर पोलिस स्टेशन (Shivaji Nagar Police Station),
डेक्कन पोलिस स्टेशनमधील (Deccan Police Station) एकुण 8 गुन्हे उघडकीस आले. (Pune Crime News)

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे
(IPS Rajendra Dahale), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ
(Sr PI Vinayak Vetal), पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिपाली भुजबळ (PI Deepali Bhujbal) यांच्या
मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव खिलारे, पोलिस हवालदार विजय सावंत,
पोलिस हवालदार विशाल गाडे, पोलिस हवालदार रामा ठोंबरे, पोलिस हवालदार विलास तोगे, पोलिस हवालदार रमजान शेख, पोलिस नाईक गणेश गायकवाड, पोलिस नाईक विवेक जाधव,
पोलिस नाईक सचिन भोसले, पोलिस नाईक बालाजी घोडके आणि पोलिस नाईक प्रविण पडवळ यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :-  Pune Crime News | Koregaon Park Police Station – A gang of Criminals who used various pretexts to steal bags from four-wheelers were arrested, 8 crimes were solved.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा