Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – भांडणे सोडविण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | साथीदाराला मारहाण (Beating) करीत असल्याचे पाहून त्याला सोडविण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला पाच जणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Pune Police) पाच जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

शुभम माने (वय २२), शुभम साळवे (वय २२), आकाश चिकटे (वय २७), तेजस जगताप (वय १९), कृष्णा राठोड (वय १८, सर्व रा. ताडीवाला रोड – Tadiwala Road) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत यातीन अब्दुल अत्तार (वय ३१, रा. शांतीरक्षक सोसायटी, शास्त्रीनगर, येरवडा) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९३/२३) दिली आहे. हा प्रकार बंडगार्डन येथील ससून रोडवरील सतनाम ट्रॅव्हल्स (Satnam Travels Sasoon Hospital Road) येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सतनाम ट्रॅव्हल येथे कामाला आहेत.
त्यांच्यासोबत काम करणारा मुकेश कुमार सरोज याला शुभम माने व शुभम साळवे हे कारण नसताना मारहाण
करत होते. त्यांनी सरोज याचा गळा पकडल्याचे पाहून फिर्यादी त्याला सोडविण्यासाठी गेले.
तेव्हा माने याने साथीदारांना बोलावले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन आज तुझा मॅटरच क्लोज करतो, असे बोलून तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. तसेच फिर्यादी चे सहकारी गोविंद यालाही दगड मारुन जखमी केले. अनिल याचे नाक फ्रॅक्चर करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत (PSI Sawant) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Koregaon Park Police Station – Attempt to kill a youth by throwing a stone on his head when he came to settle a dispute; Five people were arrested

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Political Crisis | विधानसभा अध्यक्षांचे सूचक विधान; म्हणाले – ‘लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार’