Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – तारांकित हॉटेलमध्ये राहून बिलाची रक्कम पुन्हा स्वत:कडे वळती करुन घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तारांकित हॉटेलमध्ये ते तरुणींसह राहिले, बार रेस्टॉरंटमध्ये (Bar Restaurant) बसून महागड्या दारुचा आस्वाद घेतला. क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card) पेमेंटही केले. परंतु कार्ड स्वाईप करताना लागणारी कागदपत्रांची पुर्तता न करता ते रुम सोडून गेले. क्रेडिट कार्डवरील झालेले व्यवहार रद्द करुन हॉटेलला गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अरविंद कुमार सिंग (वय ४८, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश बत्सल, आदित्य गुप्ता (रा. उज्जैन, मध्य प्रदेश – Ujjain Madhya Pradesh), प्रणिता इंगळे (रा. बीड – Beed), हर्ष जेठवाणी (रा. लक्ष्मीनगर, सातारा – Satara), अंजली नथानी (रा. जळगाव – Jalgaon), राहुल शर्मा (रा. इंदौर, मध्य प्रदेश – Indore, Madhya Pradesh) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ओ हॉटेलमध्ये २ ते १३ मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे ओ हॉटेलचे सरव्यवस्थापक आहेत. आरोपी यांनी हॉटेलचे ऑनलाईन तसेच थेट बुकिंग केले. २ ते १३ मार्च दरम्यान ते हॉटेलमध्ये राहिले. ११ मार्च रोजी ते स्काय बार रेस्टॉरंटमध्ये (Sky Bar Restaurant) बसुन महागड्या दारु प्यायले. त्यांच्या २ ते १३ मार्चपर्यंतचे बिल ५ लाख ४५ हजार ३६३ रुपये झाले. ते बील वेळोवेळी क्रेडिट कार्डन अदा करताना हॉटेल व्यवस्थापनेकडून क्रेडिट कार्ड स्वाईप करताना लागणारी कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगूनही ती केली नाही. रुम सोडून जाऊन क्रेडिट कार्डवरील झालेले व्यवहारही अनधिकृतरित्या करुन हॉटेलची एकूण ५ लाख ४५ हजार ३६३ रुपयांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.

 

Advt.

Web Title :  Pune Crime News | Koregaon Park Police Station – Stayed in a star hotel and
cheated by diverting the bill amount to himself.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा