Pune Crime News | स्वत:च्या मृत्यूचा बनाव करुन वावरणाऱ्या वाहन चोरास कोथरुड पोलिसांनी केली अटक

0
194
Pune Crime News | Kothrud police arrested a vehicle thief who faked his own death
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | स्वत:च्या मृत्यूचा बनाव करुन वावरणाऱ्या वाहन चोराच्या कोथरुड पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी कडून वाहन चोरीचे (Vehicle Theft) दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. विवेक मिश्रा (रा. ता. महेर, जि. सतना राज्य मध्य प्रदेश) असे अटक करण्यात (Pune Crime News) आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) इर्टिगा (एमएच 12 पी एन 7527) चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना विवेक मिश्रा याच्यावर संशय आल्याने पोलीस आरोपीचा शोधत होते. मात्र विवक मिश्रा ही व्यक्ती मयत असल्याची माहिती नातेवाईक, इतर मित्र परिवार तसेच स्थानिक वर्तमान पत्रातून पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची शहनिशा केली असता विवेक मिश्रा हा जिवंत असल्याची माहिती समोर आले. (Pune Crime News)

आरोपी विवेक मिश्रा हा वाहन चोरी करत असून त्याने कोथरुड येथून चोरलेली इर्टिगा नंबर बदलून वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच आरोपी चोरीची गाडी घेऊन कोथरुड येथे येणार असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चोरीच्या गाडीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) पौड पोलीस ठाण्याच्या (Paud Police Station) हद्दीतून अॅक्टिव्हा दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhel Sharma),
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior Police Inspector Hemant Patil), पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade), पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस अंमलदार चौधर, सुळ, शिर्के, राठोड, वाल्मिकी, दहिभाते, शेळके, राऊत यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Kothrud police arrested a vehicle thief who faked his own death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shamita Shetty H’Bday | शमिता शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या खाजगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी

Shivsena Thackeray Group | उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचे निर्देश; जाणून घ्या काय आहे कारण

Maharashtra MLC Election Result | नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी; भाजपचे नागो गाणार पराभूत