Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – पती, मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; मंदिरात नेऊन केले लग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मामीचे नाते असलेल्या आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिलेला तिच्या पतीला, मुलाला ठार मारण्याची धमकी (Threat to kill) देऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. इतकेच नाही तर त्यांचे लग्न झाले असतानाही मंदिरात नेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करुन गळ्यात मंगळसुत्र घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत कोथरुड पोलिसांनी किरण दत्तात्रय मारणे Kiran Dattatraya Marne (वय २५, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड – Sutardara, Kothrud) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२०/२३) दिली आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी, सातारा, कोल्हापूर, जांभुळवाडी येथे फेब्रुवारी ते २३ मे २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातेवाईक आरोपीने त्यांच्याबरोबर सेल्फी काढत. मार्च २०२३ मध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्यांचे पती, मुलगा व इतर नातेवाईकांना जीव ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर ११ मे रोजी फिर्यादींना आपल्या केळेवाडीतील रुमवर बोलावून तेथे त्यांना पुन्हा धमकी देऊन त्यांना सातारा, कोल्हापूर, येथे घेऊन गेला. तेथे लॉजवर त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर फिर्यादी यांना जाभुंळवाडी येथे घेऊन जाऊन तेथील मंदिरात फिर्यादीच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घालून लग्न केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आडगळे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Kothrud Police Station – Woman assaulted by threatening
to kill husband, child; Married in the temple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा