Pune Crime News | दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दुचाकीचा धक्का लागल्याने त्याचा जाब विचारला. त्यावरुन भाईगिरी करणार्‍या तिघांनी एकावर कोयत्याने (Koyta) वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. हवेत कोयता फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे ओरडून दहशत पसरविली. (Pune Crime News)

याप्रकरणी पवन पवरचंद घागट (वय ४६, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश विष्णु अडागळे Ganesha Vishnu Adagale (वय २०, रा. दापोडी) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार व एका अल्पवयीन मुलावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, जावई व मुलगी हे भाजी आणण्यासाठी जात होते. छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतेवेळी फिर्यादीचे मागून एका दुचाकीवर बसून तिघे जण आले. त्यांच्या गाडीचा धक्का फिर्यादीच्या गाडीला लागला. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारल्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. आम्ही या एरियाचे भाई आहोत, तू ओळखत नाही काय, असे म्हणून त्यांच्यातील एकाने कमरेच्या शर्टखाली ठेवलेला कोयता काढून फिर्यादीवर वार करुन गंभीर जखमी केले. त्याने हवेत कोयता फिरवून तेथे उपस्थित लोकांना दमदाटी करीत दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Koyta tried to kill himself by stabbing him after being asked about being hit by a bike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा