Pune Crime News | पहिल्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, कोथरुड परिसरातील घटना; सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नियोजित इमारतीचे बांधकाम करत असताना पहिल्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला. हा प्रकार कोथरुड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सी (Hill View Residency) या बांधकाम साईटवर (Construction Site) घडला आहे. याप्रकरणी बांधकाम साईटवरील सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

संजय ठाकूर असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप दिनेश साहनी (रा. सोपानबाग, घोरपडी, पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून साईट सुपरवायझर कल्याणी सिंगे (Site Supervisor Kalyani Singe), कॉन्ट्रॅक्टर हेमेंद्र परमार (Contractor Hemendra Parmar), ठेकेदार सुबोध जोगींदर यादव Subodh Joginder Yadav (सध्या रा. पुणे) यांच्यावर आयपीसी 304(अ), 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथे हिल व्ह्यू रेसीडेन्सी कमर्शियल बांधकाम साईट सुरु आहे. फिर्यादी आणि मयत हे दोघे या बांधकाम साईटवर मजूरी करता. संजय ठाकूर हे बुधवारी (दि.29 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्याच्या लाकडी फळ्या काढत होते. तेव्हा तोल जाऊन ते तळमजल्यावरील शॉपच्या समोरील पोर्चमध्ये पडले. यामध्ये गंभीर जखमी होऊन संजय ठाकूर यांचा मृत्यू झाला. बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही साधनसामग्री न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांच्या देवाण-घेवाणीतून गॅरेज चालकावर हल्ला, घोरपडे पेठेतील घटना

फळ विक्रेत्याला अडवून कोयत्याने वार, जबरदस्तीने पैसे लुटणारा गजाआड; येरवडा परिसरातील घटना

विवाहित प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात धक्कादायक प्रकार! टायरला 16 पंक्चर असल्याचे भासवून फसवणूक