Pune Crime News | कॅनडातील मुलाच्या बनावट सह्या करुन डॉक्टर महिलेची जमीन हडपली; बारामतीमधील प्रकार

पुणे : Pune Crime News | मुलगा कॅनडा असताना त्याच्या नावाने बनावट सह्या करुन, बनावट महिला उभी करुन एका महिला डॉक्टरांची जमीन हडप करण्याचा प्रकार बारामतीमध्ये (Baramati Crime News ) समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी येरवडा येथे राहणार्‍या एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ महिला डॉक्टरांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मंगेश विलास काळे Mangesh Vilas Kale (रा. रामवाडी गोपाळवाडी, ता. दौंड), राहुल सुरेश माने Rahul Suresh Mane (रा. दौंड), किरण पाटील Kiran Patil (रा. थेरगाव), शिवराज हनुमंत थोरात Shivraj Hanumant Thorat (रा. सूर्यनगरी, बारामती) आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त कॅनडा येथे असतो. त्यांनी बारामती येथील बिगर शेती प्लॉट २२ एप्रिल १०९४ रोजी खरेदीखत करुन घेतला.
त्यानंतर आता १२ मार्च २०२३ रोजी वृत्तपत्रात नोटीस वाचली.
त्यात त्यांची जमीन मंगेश विलास काळे याचे नावे असल्याचे समजले.
त्याबाबत त्यांनी चौकशी केली. तेव्हा हवेली दुय्यम निंबधक कार्यालयात
(Haveli Secondary Imprisonment Office) ४ ऑगस्ट २०२२ रोजी एक बनावट कुलमुखत्यार
दस्त नोंदविण्यात आला. त्यात फिर्यादी यांच्या जागी दुसरीच महिला उभी करण्यात आली.
त्यावर साक्षीदार म्हणून राहुल माने व किरण पाटील यांनी सह्या केल्या. (Pune Crime News)

या कुलमुखत्यार दस्त करुन त्यानंतर मंगेश काळे याने बारामती (Baramati News )
सब रजिस्टार कार्यालयात फिर्यादी यांच्या मालकीची मालमत्ता मंगेश काळे याने १३ लाख रुपयांचे
खुशखरेदी खत केले. त्यावेळी त्यांच्या जागी पुन्हा या अनोळखी महिलेला उभे केले. फिर्यादी यांची खोटी सही केली.
त्या करीता साक्षीदार म्हणून त्यांचा मुलगा रोहित यशवंत डोईफोडे (Rohit Yashwant Doifode)
याची खोटी सही केली. हे खरेदीखत झाले, त्यावेळी त्यांचा मुलगा हा कॅनडाला नोकरीला होता.
शिवराज थोरात हा साक्षीदार म्हणून आहे. त्यांना फिर्यादी या ओळखत नाही.
त्यानंतर त्यांनी जागेवर जाऊन पाहिले तर त्यांच्या नावाचा बोर्ड उखडून टाकल्याचे दिसून आले.
तलाठी कार्यालयात जाऊन माहिती घेतल्यावर मंगेश काळे याने त्यांचे नाव कमी करुन स्वत:चे नाव
लावण्यासाठी अर्ज देऊन फेरफार मंजूर करुन घेतल्याचे दिसून आले.
सर्वांनी संगनमत करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :  Pune Crime News | Land grabbing of doctor woman by fake signature of child in Canada; Type in Baramati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dnyanoba Tukaram Award | सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, स्वामी श्री गोविंददेव गिरी, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्रदान

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण